वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावर सोमवारी (दि. 3) सकाळी व दुपारी दोन वेगवेगळे अपघात झाले. या अपघातांमध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागकडून पेणकडे जाणार्या चारचाकी वाहनातील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला धडकले. त्यामध्ये वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. हा अपघात गोकुळेश्वरनजीक झाला. तसेच तिनवीराजवळ सोमवारी दुपारी दगडाने भरलेला ट्रक अलिबाग-पेण मार्गावरून जात होता. दरम्यान, धडक लागल्याने ट्रकमधील दगड खाली कोसळले. त्यामुळे मागे असलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अलिबाग-पेण मार्गावरील या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अलिबाग व पोयनाड पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.