ट्रकमधील लाखोंचा माल चोरणारे दोघे जेरबंद

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलजवळील मुंबई एक्स्प्रेसवर ब्रीजच्या 500 मीटर अलीकडे ट्र्‌‍क चालकाला झोप लागल्याने गाडी बाजूला लावून तो झोपला होता. दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा माल ट्रकमधून चोरुन नेल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.

तक्रारदार प्रविन्द्र सींग ठाकूर, (34) याने याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे, पोनि (गुन्हे) आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे, पो. उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोहवा धुमाळ, तांडेल, कुदळे, बाबर, देवरे, म्हारसे, पोशी, भगत, खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी झायेद मुस्तफा फारुकी (19) व कैस मुस्तफा राईन (19), दोन्ही राहणार- तुर्भे स्टोअर झोपडपट्टी, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल फॅब्रिक रोल्स एकूण 3 बॉक्स किंमत 22,000 रुपये ज्या बॉक्सवर प्लास्टिक कॅरीबॅगने गुंडाळले होते. तसेच त्यावर लाल अक्षरामध्ये असे लिहिलेले होते. कॉफी पावडरचे- माऊंटन ट्रॉल फूड्स प्राव्हेट लिमिटेड असे लिहिलेले एकूण 25 गोणी व 10 बॉक्स असे एकूण 35 बॉक्स किंमत अंदाजे 2,60,000 रुपये. असा एकूण 2,82,000 लाख रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आले आहे.

Exit mobile version