गॅरेजमधील चोरीप्रकरणी दोघे अटकेत

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील परपुंड गाव येथील एका गॅरेजमध्ये चार जणांनी मिळून केलेल्या चोरीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

येथील ओमेमॉ इंजिनिअरिंग गॅरेज या ठिकाणी असलेल्या वॉचमनला अज्ञात इसमांनी मारहाण करून येथील शेडखाली उघड्यावर ठेवलेला डोझरचे 14 रोलर, आठ कॅरर रोलर आणि इतर भंगार सामान असा मिळून पिकअप टेम्पोमधून ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक हर्षद जुईकर, पोहवा महेश पाटील, अमोल पाटील, पोना मिथुन भोसले, अशोक राठोड, पोशी विशाल दुधे आदींचे पथक या गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेत होते. पोना मिथुन भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन या गुन्ह्यातील काही आरोपी आंबिवली कल्याण ठाणे येथे लपले आहेत. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून आरोपी नसिम मंजूर खान (21), बद्री आलम मेहमुद अलम खान (38) या दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा पोलीस करीत आहेत.

Exit mobile version