दोन महिने सकारात्मक घटकाचाच विचार – रोहित शर्मा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सकारात्मक असो वा नकारात्मक, बाहेरून येणाऱ्या घटकांसाठी दरवाजे मी पुढील दोन महिन्यांसाठी बंद केले आहेत आणि शक्य तेवढा निर्धास्थ रहाणार आहे. परंतु पुढील दोन महिन्यांत मला संघासह अविस्मरणीय आठवणी निर्माण करायच्या आहेत, असे मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. दोन दिवसात सुरू होणारी आशिया चषक आणि त्यानंतर मायदेशात होणारी विश्वकरंडक स्पर्धा यासाठी कर्णधार म्हणून रोहितवर दडपण येण्याची शक्यता आहे, पण रोहितने त्यासाठी स्वतःचा मार्ग आतापासूनच शोधला आहे. आशिया करंडक स्पर्धेसाठी बंगळूर येथे सराव शिबिर संपल्यानंतर रोहितने पीटीआयशी संवाद साधला. कोण काय बोलतोय याकडे दुर्लक्ष करून स्वतःची मानसिकता मला बळकट करायची आहे आणि त्यासाठी 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीची मानसिकता मला प्रथम फलंदाज म्हणून पुन्हा तयार करायची आहे. त्या आठवणी, इंग्लंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत रोहितने सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम करताना 648 धावा केल्या होत्या.असे तो म्हणाला.

मी आता चांगल्या आणि सक्षम मानसिकतेमध्ये आहे आणि ही मानसिकता पुढच्या आव्हानासाठी अधिक सक्षम करण्याकरिता मला 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील आठवणी जाग्या करायच्या आहेत.

रोहित शर्मा, कर्णधार

एका रात्रीत बदल नाही
खेळाडूचे यश-अपयश एका रात्रीत बदलत नाही. एका निकालामुळे किंवा एका अजिंक्यपदामुळे माझ्यामध्ये बदल झाला नाही. गेल्या 16 वर्षांपासून मी आहे तसाच आहे. त्यात बदल करावा असे मला कधीच वाटले नाही. म्हणून पुढच्या दोन महिन्यांत आखलेली ध्येय कशी गाठायची हाच विचार माझा आणि माझ्या संघाचा असणार आहे, असे रोहितने सांगितले.

आकडेवारीला प्राधान्य देत नाही
गेल्या 16 वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये ङ्गतू तुझे प्रभावी अस्तित्व निर्माण केले आहेस काफ या प्रश्नावर रोहितने स्पष्ट नाही असे सांगितले. मी स्वतःबद्दल फुशारकी मारणार नाही. लोकच ठरवू शकतील, मी काहीच बोलणार नाही, असे रोहितने सांगितले. 17 वर्षांच्या कारकिर्दीत रोहितने 30 एकदिवसीय शतके 10 कसोटी आणि चार टी-20 शतकांसह 17 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. मी आकडेवारीला प्राधान्य देत नाही, प्रेक्षकांसमोर मैदानात घालवलेला वेळ मला आनंद देत असतो, असे रोहित पुढे म्हणाला.

Exit mobile version