दुचाकीची टेम्पोला धडक; एक ठार

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावनजीक कशेने गावच्या हद्दीत दुचाकीची टेम्पोला समोरून धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदरचा अपघात शुक्रवारी (20 जानेवारी) घडला.याबाबतची फिर्याद किशन कुमार ओमप्रकाश पांडे (वय-47) रा.सुरत गुजरात यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

किशन कुमार ओमप्रकाश पांडे हे त्यांच्या ताब्यातील टाटा टेम्पो (जी.ए.03/ए.एच 7372) गाडी मडगाव ते दमण अशी मुंबई – गोवा महामार्गाने चालवीत घेऊन जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या अ‍ॅक्टिव्हा(एम.एच.06/एच.1361) या गाडीवरील चालकाने टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादाता टेम्पोला समोरून धडक दिली..या अपघातात दुचाकीस्वार करण बारकू वाघमारे (वय-30) रा.थरमरी आदिवासीवाडी ता.माणगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version