दुचाकीची ट्रॅक्टरला धडक; दोघे जागीच ठार

। नागपूर । प्रतिनिधी ।

गडचांदुर-राजुरा मार्गावर रविवारी (दि. 22) भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात गडचांदुर-राजुरा मार्गावरील पांढरपौनी गावाजवळ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास झाला. भाऊराव पांडुरंग सातपुते (52) व देवराव रामाजी सातपुते (45) हे दोघे चुलतभाऊ कामानिमित्त बाखर्डी या गावी गेले होते. काम आटोपून दोघेही राजुरा-गडचांदूर मार्गे जात होते. पांढरपौनी या गावाजवळ गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्यातच रस्ता बंद केलेला नसल्यामुळे येथून वाहनांची वर्दळ सुरूच असते. दरम्यान सातपुते यांच्या दुचाकीची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती कि या धडकेत दुचाकीवरील भाऊराव सातपुते व देवराव सातपुते या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version