| पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगाने आलेल्या कारने पादचार्याला धडक दिली. यात ओम गंगाराम तांबे रा. कामोठे यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्या दोन कारला दिलेल्या धडकेत कारचे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी अनिकेत राजेंद्र नलावडे रा. तळोजा यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वेश त्रिपाठी हे कोपरखैरणे येथे राहत असून, ते कामावर गेले होते. त्यांची कार रोडपाली सिग्नल ते पुरुषार्थ ब्रिजकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला रोडपालीसमोर पार्क केली होती. यावेळी त्यांच्या कारच्या समोर नानजीभाई पटेल यांची कार पार्क केली होती. यावेळी आणखी एक कार रोडपाली सिग्नलकडून वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेने चालणार्या ओम तांबे याला धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला.