। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
वाळूजलगतच्या नायगावातील बकवालनगर कामगार वसाहतीत एक दुर्घटना घडली. सुनैनादेवी अनिल पंडित (वय 35, रा. बकवालनगर) या मंदिरात जाण्यासाठी फुले तोडण्यास त्यांच्या घराच्या धाब्यावर गेल्या होत्या. तेथे रात्री झालेल्या पावसाचे पाणी साचलेले होते. ओलावा झाल्याने त्या पाण्यात वीज पुरवठा उतरला होता. याचवेळी सुनैनादेवी यांना विजेचा धक्का बसून त्या जागेवरच कोसळल्या. त्यांचे पती मदतीसाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. दरम्यान, त्यांनी सुनैनादेवी यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी बजाजनगरातील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.