। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भारतीय बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्स 2022 चे आयोजन बालेवाडी पुणे येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो, 90 किलो, 95 किलो, 100 किलो गटातील भारतातील विविध राज्यातील बॉडी बिल्डर्सना खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व रोहा तालुक्यातील चिकणी मधील 70 किलो गटात उदय देवरे या बॉडी बिल्डर्स ने केले होते. या स्पर्धेत उदय देवरे यांनी 70 किलो गटात मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्सलसाठी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. विनायक फिटनेस जिम कडून या स्पर्धेसाठी सर्वोत्तम तयारी करून घेतली. या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर्सने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्यानंतर जिल्हातुन त्यांचे विशेष कौतुक होत आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.