। उरण । वार्ताहर ।
उलवे नोड मध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे मंडळ तसेच उलवे विभागात सामाजिक, क्रीड़ा, आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत राहून मोलाचे योगदान व उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्द्ल सामाजिक बांधिलकी जोपासत अशा व्यक्तींना उलवे रत्न सन्मान देण्यासाठी आम्ही उलवे कर मित्र मंडळच्यावतीने सचिन घरत, सचिन राजे येरुणकर यांच्या वतीने उलवे रत्न गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम् म्हात्रे,अरुण भगत, रघुनाथ घरत, नारायण घरत, रवी पाटील, रविंद्र पाटील, माई भोईर, अमर म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे. राजेंद्र घरत, शिरीष कडु, मिलिंद पाटील,आम्ही उलवेकर मित्र मंडळ पदाधिकारी व उलवे वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.