तरुण पिढीसमोर नवा आदर्श
।पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील सूर्यकांत खैरे यांनी आपला मुलगा समीर याच्या लग्नातील आर्थिक स्वरूपातील मिळालेला आहेर पुणे येथील स्नेहवन या बालकांचे संगोपन करणार्या सामाजिक संस्थेला मदत करून समाजा समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे .
नांदगाव येथील समीर खैरे आणि निरक्षा यांचा विवाह शनिवार 26 मार्च रोजी संपन्न झाला या नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नात मिळणारा आर्थिक स्वरूपातील आहेर बालकांचे संगोपन करणार्या समाजिक संस्थेला मदत करायचे ठरविले होते. त्यानुसार त्याच्या लग्नात मिळालेला आर्थिक स्वरूपातील आहेर रुपये 55555 चा चेक पुणे येथील स्नेहवन या संस्थेला देण्यात आला. हा धनादेश स्नेहवन या सामाजिक प्रकल्पाचे संस्थापक अशोक देशमाने यांना लग्नसोहळात सुपूर्द करण्यात आला. त्याच्या या निर्णयातून समाजाप्रती असणारी बांधिलकी दिसून आली. आजच्या तरुण पिढीसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
स्नेहवन सामाजिक प्रकल्प
अशोक देशमाने या तरुणाने 26 व्या वर्षां आपली नोकरी सोडून स्नेहवन हा सामाजिक प्रकल्प 2015 मध्ये पुणे येथे सुरू केला. स्नेहवनमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊस तोडकामगार, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संगोपन आरोग्याची संपूर्ण जबाबदारी मुलांचा सर्वांगीण विकासयावर भर देऊन एक आदर्श तरुण बनवण्यासाठी काम करत आहे. मुलांना शालेय शिक्षणा व्यतिरिक्त योगा, कुकिंग, शेती, डेअरी फार्मिंग, ऑरगॅनिक फार्मिंग या प्रकारचे शिक्षण दिले जाते. स्नेहवन या सामाजिक प्रकल्पामार्फत ज्ञानालय, कामधेनु, गौशाला, मोफत ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र हे चालू आहेत. स्नेहवन या सामाजिक प्रकल्पात 180 मुलांचे संगोपन केले जात आहे
आत्महत्या ग्रस्त शेतकरी, ऊस तोडकामगार, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण व संगोपन करणार्या स्नेहवन या सामाजिक प्रकल्पाला आर्थिक मदत करून आमच्या संसाराला सुरुवात करीत आहोत याचा मला अभिमान वाटत आहे.
-समीर खैरे