। रसायनी । वार्ताहर ।
जेलमधील बंदीजनाकरीता संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यानंतर
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर भजन स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात राज्याचे तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. सदरप्रसंगी राज्याचे गृह सचिव लिमये, उपसचिव गद्रे आणि तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आणि नंदकुमार बंड, शेखर पाटील आणि संगीत क्षेत्रातील ज्ञानेश्वर शिंदे आणि विवेक थिटे उपस्थित होते.