। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यास मंजूर झालेले पासपोर्ट कार्यालय पुढील महिन्यात अलिबाग येथे सुरु होईल असे जिल्ह्याचे खा. सुनिल तटकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना सुतारवाडी येथे देण्यात आली होती. पासपोर्ट कार्यालय सुरू होण्यात येणार्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वालेकर सुतारवाडी येथे गेले होते.तसेच नियोजित पासपोर्ट कार्यालय जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे व्हावे असा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेत मंजूर करावा अशी विनंती जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा व विद्यमान पालकमंत्री आदिती तटकरे याच्याकडे केला होता.
त्यानुसार जिल्हा परिषदे ठराव मंजूर केला. त्यानंतर जागा पाहणीसाठी केंद्रीय पथक अलिबाग येथे आले. डाक अधिक्षक यांच्या कार्यालयाशेजारील जागा निश्चित केली. सदर कार्यालय अलिबाग येथे एका महिनाभरात सुरु होईल असे खा. तटकरे यांनी यावेळी सांगितले. पण 5 महिने उलटून गेले तरी पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनास मुहूर्त सापडत नाही.