। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या शेलू आणि बांधिवली या गावांमध्ये सध्या जोरदार बांधकामे सुरु आहेत. मात्र, नदी जवळील पूर रेषा तसेच नैसर्गिक नाले आणि रस्त्यांच्या कडेला किरण्यात आलेल्या बांधकामांमुळे नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे शेलू आणि बांधिवली भागात शासनाने बिनशेती परवाने देताना कायदे धाब्यावर बसविले असल्याचे चित्र असून भोळे बालाजी कॉन्स्ट्रक्शन कंपनीकडून अनधिकृत बांधकाम केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वे स्थानकात असणार्या शेलु-बांधिवली हद्दीमध्ये भोले बालाजी कंट्रक्शन यांच्याकडून के.बी.के. नगर विकसित करण्यात आले आहे. मूळचे ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी असलेले भोळे बालाजी कॉन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने तिकडे सुरु असलेली चाळ पद्धत कर्जत तालुक्यात पहिल्यांदा आणली. या बिल्डरकडून शेलू भागात चाळी बांधून या बिल्डरकडून रहिवाशी यांच्यासाठी घरे देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी महसूल विभागाच्या जागेत अनधिकृत चाळी बांधल्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी करण्यात आलेले ते सर्व बांधकाम नैसर्गिक नाल्या लगत करण्यात आल होेते. दरवर्षी पावसाळ्यामधील पाणी सर्व चाळीमध्ये जात असते त्यासाठी शासनाचे लाखो रुपये दरवर्षी खर्च होत असतात. त्याचा परिणाम तेथे राहण्यास आलेल्या रहिवाशी यांना नेरळ पोलीस तसेच महसूल प्रशासनाला पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्यानंतर स्थलांतरित करण्याची वेळ येत असते.
त्यामुळे शेलू आणि बांधिवली भागात भोळे बालाजी कॉन्स्ट्रुचशनकडून करण्यात आलेल्या अधिकृत बांधकामांना रोखण्याची गरज बनली आहे. त्यांच्या नवीन बांधकाम साईट जवळ असलेली नदी तसेच त्या चाळींमधील आणि नवीन गृह संकुलातील सांडपाणी यांचा निचरा कसा होणार, याकडे देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. यामुळे उल्हास नदी प्रदूषित होण्यास मदत होईल आणि शुद्ध पिण्याचे पाणी देखील मिळणे अवघड होईल, अशी चर्चा येथील स्थानिंकामध्ये होत आहे.