| खांब | वार्ताहर |
मागील आठवड्यापासून अधूनमधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील पुगाव येथील शेतकरीवर्गाचे फार मोठे नुकसान केले आहे.
ऐन भातशेतीचे तयार हंगामात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने या पावसाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. तर मागील आठ दिवसांपासून अधूनमधून बरसत असणाऱ्या पूर्व मोसमी पावसामुळे तयार भातशेतीचे कापणी, झोपडीच्या हंगामात धुमाकूळ घातलायला सुरूवात केली असल्याने भातशेतीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो, परंतु शेतीवर सतत येणारी नैसर्गिक संकटे तसेच वाढती महागाई व मजुरांचा अभाव त्याचप्रमाणे घटत जाणारे उत्पादन यामुळे शेती क्षेत्राकडे शेतकरी वर्गाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असल्याने लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे.अशातच काही शेतकरीवर्गानी मात्र आपला पिढीजात व्यवसाय सांभाळून ठेवला आहे. परंतु, सतत येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर, पूर्व मोसमी पावसामुळे पुगावसह अन्य भागात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.