कर्जतच्या शेतकऱ्याची यशोगाथा
| कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील बारणे या गावी राहणारे व पेशाने शिक्षक असलेले राजेंद्र फुलावरे शेतीची प्रचंड आवड असल्याने आपल्या विभागातील शेतकरीवर्गास समृद्ध करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास सुरूवात केलेली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कोकणातील प्रसिध्द आणि हमखास येणारे पीक म्हणून आंब्याची ओळख आहे. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन, ऑनलाईन चर्चा करून, आपल्या शेतीत आंब्याच्या विविध जातींची लागवड केलेली आहे. यात हापूस, केशर, राजापुरी, नीलम, रत्ना अशा स्वरूपातील विविध देशी जाती, तर विदेशांमधील थाई कॅटिमॉन, सुपर कॅटिमॉन, बनाना मँगो, टॉमी, मियाजाकी मँगो अशा जातींची लागवड करून त्यापासून उत्पन्नही मिळण्यास सुरूवात झालेली आहे. यातील मियाजाकी आंब्याची किंमत प्रतिकिलोस लाखाच्या घरात आहे. ही मियाजाकी मँगोची जात जपान देशातील आहे. फुलावरे यांनी आपल्या शेतात फणसाच्याही देशीसोबत विदेशी बाराहून अधिक जातीची लागवड करून उत्पन्न मिळवण्यास सुरूवात केलेली आहे.
शेतामध्ये व्हाईट जांभुळ, बहाडोली जांभुळ, लिंबूच्या अनेक जाती, काजू, चिकू, जाम, अंजीर, गोड चिंच, रेड कश्मिरी ॲपल बोर, थाई ॲपल बोर, कोलंबस नारळसह नारळाच्या विविध जाती, पपई अशा अनेक फळांच्या जाती लावल्या आहेत. यासह शेततळे काढून त्यात मासेपालनही करत आहेत.
लाखो रुपये किलोचा भाव
यातील मियाजाकी आंब्याची किंमत प्रतिकिलोस लाखाच्या घरात आहे. ही मियाजाकी मँगोची जात जपान देशातील आहे. फुलावरे यांनी आपल्या शेतात फणसाच्याही देशीसोबत विदेशी बाराहून अधिक जातीची लागवड करून उत्पन्न मिळवण्यास सुरूवात केलेली आहे.
कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीत विविध पिके घेतली पाहिजेत, शेतीत नाविन्याची कास धरली पाहिजे. शेतीला जोडधंदा म्हणून फळलागवड कुक्कुटपालन, शेळीपालन, मासेपालन, यासारखे विविध व्यवसाय छोटेखानी स्वरूपात का होईना, पण केले पाहिजेत, त्यामुळे शेतकरीवर्गास आर्थिक समृद्धता व स्थैर्यता प्राप्ती होईल.
राजेंद्र फुलावरे,
शेतकरी