| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला ताप, मलेरिया काविळ या सारख्या आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे सदर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात पहावयास मिळत आहे. सध्या पावसाने दरी मारल्याने ढगाळ वातावरण, सातत्याने हवेत होणारा बदल यामुळे अनेक व्याधीनी रुग्णाने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. डॉ. प्रकाश मेहता यांनी सांगितले की सध्या हवामानातील बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे तसेच दुषित पाण्यामुळे रहिवाशांना सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, ताप यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपले परिसर स्वच्छ ठेवून, घरातील पाणी उकळून घ्यावे, तेलकट पदार्थ खाणे टाळावे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने सदर आजारांवर उपचार करून घ्यावेत.







