गोवे-कोलाड | वार्ताहर |
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने शिवप्रेमी गावदेवी मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ बाहे यांच्या पुढाकाराने सरपंच वसंत भोईर व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून बाहे येथील हनुमान मंदिर सभागृहात कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस येथील लाभार्थ्यांना देण्यात आला.
सार्वजनिक साखर चौथ गणपती उत्सवादरम्यात गावातील युवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एक चांगला उपक्रम राबविण्यात आला असून, यावेळी विविध परिसरातील व गावातील नागरिकांना 150 व्यक्तींना पहिला डोस, तर 20 व्यक्तींनी दुसरा, अशा एकूण 170 जणांनी कोरोना लस डोसचा लाभ घेतला.