चौथ्या टप्प्याच्या दुसर्‍या दिवशी नवेदर बेली गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने शुक्रवार (दि.8) पासून लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. चौथ्या टप्प्याच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 9) नवेदर बेली गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण तोडकरी हॉस्पिटल येथे करण्यात आले. तसेच या मोफत लसीकरणाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील चित्रलेखा पाटील यांनी केलेले आहे. शेकापच्या माध्यमातून या आधी मोफत लसीकरणाचे 3 टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात येत आहे.
10 ऑक्टोबरला रामराज विभागात भिलजी – बोरघर आणि परिसरातील गावांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार आहेत. आणि 11 ऑक्टोबरला रोहा तालुक्यातील धोंडखार ( दापोली ) या गावाचे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version