। कर्जत । प्रतिनिधी ।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला भर चौकात न्यायालयाने फाशी द्यावी म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले तर याबाबत पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले असून याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वस्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे महायुतीतल्या शिंदेंच्या शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी द्या म्हणून कर्जत शहराच्या टिळक चौकात वाल्मीक कराड यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. तर यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आले आहे.