। तळा । वार्ताहर ।
तळा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माणगांव यांच्या कोर्टातील खटला आहे.
गुन्ह्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माणगांव न्यायालयात 15 जुलै 2024 रोजी निर्दोष असा दिला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढर्या रंगाची, पिकअप वाहन मागील बाजूस एम.एच.06 ए.जी.6014 असा नंबर व गाडीचे उजवे बाजूस 3897 असा नंबर असलेली गाडी ही कोणीही दावा न केलेली, हक्क न सांगितलेली मालमत्ता असल्याने गाडी अपिल कालावधीनंतर जाहीर लिलाव करून विक्री किंमत सरकार जमा करण्यात यावी असा आदेश आहे.वाहन तळा पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या पटांगणात उभे असून लिलाव होण्याबाबत अहवाल प्राप्त आहे. लिलावातील वाहन विकत घेणारे, अधिकृत भंगार घेणार्यांनी तळा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.