मोहंमद तांबे यांना वसंत स्मृती पुरस्कार

| म्हसळा | वार्ताहर |

माजी आमदार, तथा माजी खासदार स्व. वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणारा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार अंजुमन -इ -इस्लाम जंजिरा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज म्हसळाचे प्राचार्य मोहंमद मल्लूलासाहेब तांबे यांना देण्यात आला.

बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तांबे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. विनय सहस्त्रबुध्ये, माजी खास. संजीव नाईक, आम. संजय केळकर, ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष आम. निरंजन डावखरे, संदीप लेले, विकास पाटील, सचिन मोरे,विनोद भानुशाली, एन. एस. भामरे, किशोर पाटील, दिनेश भामरे, विनोद शेलकर, ज्ञानेश्‍वर घुगे आदि मान्यवर उपस्थित होते. स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन नसीर मिठागरे, गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड, हलका मजलीसचे अध्यक्ष फझल हलडे, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवरांनी तांबे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version