| रसायनी | वार्ताहर |
पृथ्वी, पर्यावरण यांचे रक्षण संरक्षण करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याचीच आठवण करून देण्यासाठी रायगडात वसुंधरा पायी दिंडीचे स्व स्वरूप संप्रदायतर्फे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे आगमन शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साई बाबा मंदिर, बेलपाडा, खारघर येथे होणार आहे.
वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचे, निसर्गाचे संतुलन ढासळले आहे, हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे, त्याचा पर्यावरण, शेती उत्पादन यावर मोठा परिणाम होत आहे, म्हणूनच या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी, जागरूकता आणि समर्थन करण्यासाठी जगद्गुरु श्रींच्या या पायी दिंडी सोहळ्याला वसुंधरा पायी दिंडी असे संबोधण्यात आले आहे. या दिंडीचे प्रस्थान शनिवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. शिव मंदिर खांदा कॉलनी ते शिरढोण गाव ते तारागाव (वास्तव्य). दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वां. तारागाव ते अभय आश्रम, डोलावी-पेण (वास्तव्य), दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वां. अभय आश्रम, डोलावी पेण ते वाकण जैन मंदिर रोहा. (वास्तव्य), दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वां. वाकण जैन मंदिर रोहा ते इंदापूर रायगड या मार्गाने रायगड जिल्ह्यातून होणार असून, पुढे ती नानिजधाम मुख्यपीठ, रत्नागिरी साठी मार्गस्थ होणार आहे.
या दिंडीचे स्वागत करण्यासाठी रायगडकर सज्ज झाले आहेत. या दिंडी सोहळ्यात हजारो यात्रिकी सहभागी झालेले असून तब्बल 360 कि.मी. पायी प्रवास करत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न करता दि. 21 ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीच्या जन्मोत्सव दिनी 3 वसुंधरा पायी दिंड्या मुंबई ते श्रीक्षेत्र नानिज, नाशिक ते श्री क्षेत्र नानिज, परभणी ते श्री क्षेत्र नानिज येथे दाखल होणार आहेत.
रायगडात उद्या वसुंधरा पायी दिंडी
