। रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेचा चेहरा अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार माधवराव भावे यांचे ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माधवराव भावे यांनी दैनिक सागर तसेच साप्ताहिक विवेक यामध्ये विपुल लेखन केले.राजकीय घडामोडींवर देखील त्यांच्या बातम्यांमधून मार्मिक टिपण्णी होत असे.रोह्यातील कुंडलिका पतसंस्था, श्रीराम देवस्थान,वनवासी कल्याण आश्रम,रोहा तालुका पत्रकार संघ,रोहा अष्टमी बँक अशा विविध संस्थांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता.त्यांच्या निधनाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावल्याची प्रतिक्रिया शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी दिली आहे.