विक्रम – मिनिडोअर चालकांच्या मागण्या अंतिम टप्प्यावर

| शिहू | वार्ताहर |
रायगड जिल्हातील तीनचाकी, सहा आसनी विक्रम मिनिडोअर चालक मालकांच्या प्रलंबित मागण्या अंतिम टप्प्यावर असून लवकरात लवकर त्यांचा निर्णय लागणार असल्याचे रायगड जिल्हा विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रफुल भगत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे झालेल्या बैठकीत शासनाने पारित केलेल्या सुझूकी कंपनीची इको गाडी न परवडणारी असल्याने पर्यायी जेएसएम पेट्रोल सीएनजी गाडी पासिंग होणे व इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

याची दखल घेत उपजिल्हाअधिकारी पदमश्री बैनाडे यांनी तात्काळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथिल आरटीओ अधिकारी महेश देवकाते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला.त्यावेळी सदर प्रकरण हे अंतिम टप्प्यावर असून त्याबाबत लवकरात लवकर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समिती सकारात्मक निर्णय देईल असे देवकाते यांनी सांगितले. या वेळी जयराम खाडे, विश्‍वास बागूल, चेतन परबळकर, सुरेश घरत, ऍड. डाके, इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version