विशाल पाटील यांचे काँग्रेसला समर्थन

विश्वजीत कदम यांच्या समवेत घेतली खर्गे यांची भेट

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचे पाहायला मिळाले होते. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. आमदार विश्वजीत कदम देखील यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी देखील विशाल पाटील आणि विश्वजीत कदमच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन पत्र दिले. विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत. सांगलीच्या महाविकास आघाडीचे उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत संपला नाही आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. पण, या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तू तू मैं मैं करता-करता अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पदरात पडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता.

सोनिया गांधीची घेतली भेट
सांगलीचे नवनिर्वाचित अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली. दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या बंगल्यावर भेट घेतली. अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिल आहे.

Exit mobile version