। माणगाव । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माणगाव तालुक्यात सर्वत्र बुधवारी (दि.20) उत्साहात व शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. यादरम्यान तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी व माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातुन महायुतीच्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे अनिल नवगणे, अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार फैसल पोपेरे, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार अश्विनी साळवी, बळीराज सेनेचे उमेदवार कृष्ण कोबनाक, अपक्ष उमेदवार युवराज भुजबळ, अश्रफ पठाण, संतोष पवार, मोहम्मद काशीम बुरहाउद्दीन सोलकर, अंनत गीते या 11 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता शनिवार (दि.23) श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून त्यानंतर श्रीवर्धनचा आमदार कोण हे निश्चित होईल. या मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.