मावळ । प्रतिनिधी ।
सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व डॉ.अभिषेक हरिदास यांनी खासदार श्रीरंग चंदू बारणे यांचया विरोधात वडगाव मावळ येथे याचिका दाखल केली होती. निवडून येणे कामी अनेक लोकप्रतिनिधी निवडूक प्रतिज्ञापत्रात बर्याच वेळेस खोटी माहिती देताता.खासदार श्रीरंग बारणे यांनी सन 2019 ला 33 मावळ लोकसभा निवडणूकीकरीता निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर नागरीकांसाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरती टाकले होते. सदर प्रतिज्ञापत्र डाऊनलोड केले असता असे लक्षात येते की बारणे यांनी निगडी पो.स्टे.गुन्हा क्र.3271/2013 हा लपवला होता तसेच त्यांनी या पूर्वीच्या म्हणजेच सन 2009 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची एसएससी अनुत्तीर्ण 1980 मध्ये णली असल्याचे नमूद केले होते मात्र सन 2019 ची निवडणूक प्रतिज्ञात त्यांनी त्यांची एसएससी 1989 मध्ये झाल्याचे नमूद केले होते.
त्यामुळे फिर्यादी अनिल भांगारे व डॉ.अभिषेक हरिदास यांनी वडगाव मावळ कोर्टात भा.द.विव.191,199, 200 व लोकप्रतिनिधी कायदा कलम 125-अ अंतर्गत याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने व्हेरिफिकेशन करून दिनांक 04/10/2021 रोजी सी आरपीसी 202 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.