| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व भागात साठून राहिलेला कचरा उचलण्याचे काम कर्जत परिवर्तन आघाडीकडून करण्यात आले आहे. गावातील बहुसंख्य भागात साठून राहिलेला कचरा उचलण्याची मोहीम राबवण्यात आली.
नेरळ ग्रुप ग्रामपंचायत परिसरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर राजिप सदस्या सुनिता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नेरळ गावातील कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली. नेरळ ग्रामपंचायतचे प्रशासक सुजित धनगर आणि ग्राम पंचायत अधिकारी अरुण कारले यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करीत स्वच्छता विभागाचा सहभाग दाखवला. या स्वच्छता मोहिमेत अतुल चंचे, बंडू क्षीरसागर, संदेश लाड, रमेश पवार, सुधाकर देसाई, सोनू नाथ, माधवी क्षीरसागर, सुजाता मोहिते, प्राची मनवे, सुजाता भवारे, अंकिता मोरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेची सुरुवात नेरळ पाडा येथून झाली आणि मातोश्री नगर, गंगा नगर, निर्माण नगरी, साईकृपा सोसायटी, टॉकीज, टॅक्सी स्टँड, टेपआळी, भिताड आळी, चिंचआळी, गणेश नगर, मोहाची वाडी, खांडा, सम्राट नगर, राजेंद्र गुरुनगर, या परिसरातून एकूण 30 ट्रॅक्टर घनकचरा गोळा करण्यात आला.







