। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथे नववर्ष स्वागत यात्रेच्या वतीने मराठी नवीन वर्षाचे स्वागत मिरवणूक काढून करण्यात आले. स्वागत यात्रेच्या माध्यमातून नेरळ गावातील सर्व भागात नवचैतन्य निर्माण झाले होते. तर दोन वर्षाच्या कालावधीनंतर नवीन वर्षे स्वागत यात्रेच्या निमित्ताने महिला वर्गाने मोठा जल्लोष केला.
नववर्ष वागत यात्रा समितीच्या वतीने चैत्र महिन्याचा पहिला दिवस आज नवीन वर्षाचे स्वागत करून साजरा केला. समितीच्या वतीने नवीन वारशाचे स्वागत करण्यासाठी यात्रा काढण्यात आली. त्या यात्रेची सूरुवात सकाळी नेरळ येथील श्रीगुरुदत्त मंदिर येथून झाली.माथेरान नेरळ स्टेशन रस्त्याने हि स्वागत यात्रा श्री गणेश मंदिर अशी टेपआळी,महेश चित्रमंदिर अशी चावडी नाका येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहचली. तेथे महिला वर्गाने ढोल ताशाच्या गजरात ठेका धरीत भगवे झेंडे हाताने उडवीत जल्लोष केला.तेथून नववर्षे स्वागत यात्रा शिवाजी महाराज चौकात पोहचली,तेथून पुढे महावीर पेठ येथून कुंभारआळी रस्त्याने नेरळ ग्रामपन्चायत अशी कुसुमेश्वर मंदिर येथून ब्राह्मण आळी रस्त्याने लोकमत टिळक वाचनालय मार्गे जुन्या बाजारपेठ येथून श्रीराम मंदिर येथे पोहचली.तेथे महाआरती होऊन स्वागत यात्रेचा समारोप करण्यात आला.
वागत यात्रेत भजनी मंडळ,वारकरी मंडळ तसेच ब्रह्मकुमारी यांचे भारतमातेबद्दल माहिती देणारे रथ तसेच घोड्यांवर स्वार झालेले मावळे सहभागी झाले होते. नववर्षे स्वागत यात्रेत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचीम यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तर नेरळ गावातील सर्व राजकीय पक्षांचे पडदाहिकारी यात्रेत सहभागी झाले होते.