रिव्हर राफ्टिंगसाठी गेले अन् बोटीतून उतरताना मृत्यू

| कोलाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रिव्हर राफ्टिंगदरम्यान आलेल्या पर्यट्कांपैकी एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिजीत श्रीकांत कुलकर्णी (49)असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रोहा तालुक्यातील कोलाड रिव्हर राफ्टिंगदरम्यान प्रकाशगड, बांद्रा येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. महावितरणच्या मुख्य अभियंता असलेल्या ४९ वर्षीय या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पर्यटक आपल्या कुटुंबासह कोलाड रिव्हर राफ्टिंग करायला येथे पोहोचला होता. पाण्यात कुटुंबासह राफ्टिंगचा आनंद घेत ते कामथ येथे पोहोचले. तिथे थांबल्यानंतर सर्वजण त्यातून उतरले, उतरताना श्रीकांत अचानक जमिनीवर पडले. त्यांच्या कुटुंबीयांनी व इतरांनी त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीवरून पोलीस पथक दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पर्यटकाच्या मृत्यूमागे हृदयविकाराचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Exit mobile version