। मुंबई । प्रतिनिधी ।
नुकतेच राज्याचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सांगत चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर सध्याच्या राजकिय वातावरणामुळे कोणतीही अस्वस्थतता नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आग्रहाखातर कोणताही अनुभव नसताना मुंख्यमंत्री पद स्विकारले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे पद उत्तमरित्या सांभाळणे शक्य झाले. त्यांनी विश्वास दाखविला. मात्र आपल्याच कार्यकर्त्यांचा विश्वास नसेल, तर काय करायचे, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. कार्यकर्त्यांनी सांगितल्यास मुंख्यमंत्री पद सोडण्यास तयार असून राजीनामादेखील तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी गुजरातला जाऊन चर्चा करणे योग्य नाही. अशी कित्येक आव्हाने शिवसेनेने पाहिली आहेत. अशा आव्हानांना शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता घाबरत नाही. फार तर सत्ता जाईल, मात्र पुन्हा लढू. मात्र त्यांच्या संघटनेला घाबरत नसल्याचे सांगून एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाविरोधात मुंख्यमंत्र्यांनी पलटवार केला.