| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणकुळे येथील खारभूमीमार्फत जे काम सुरु करण्यात आलेले आहे ते पूर्ण कधी केले जाणार, असा सवाल माजी आ. पंडित पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
माणकुळे येथील खारभूमीच्या कामासाठी आपण आमदार असताना 10 कोटींचा निधी मंजूर केला होता. गेल्या वर्षी हे काम सुरु करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत केवळ 25 ते 30 टक्केच काम पूर्ण झाल्याचे त्यानी निदर्शनास आणले. दहा कोटींच्या कामासाठी सरकारकडून 3 कोटींची रॉयल्टी घेतली जाते. वास्तविक सरकारने या रॉयल्टीचे 3 कोटीही खारभूमीसाठी खर्च करुन हे काम वेळेत पर्ण करावे, अशी अपेक्षाही पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरु होण्यास दोन, चार महिन्यांचा कालावधी उरला आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा माणकुळेमधील खारभूमीची कामे करणे जिकिरीचे होईल, असेही त्यानी निदर्शनास आणले.