| उरण । वार्ताहर ।
उरण जेएनपीटी परिसरात गेल्या 10 ते 15 वर्षा पासून मोठ्या प्रमाणात सिएफएस वेअरहाऊस कंपन्यानी आपला पाया पक्का रोवला आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना नोकरीसाठी आंदोलने, उपोषण केल्या शिवाय न्याय मिळत नाही. मुळात अशा गोष्टी का होत आहेत. त्यामुळे उरणमधील तरुणांना व्यावसायिक व रोजगार संधी कधी मिळणार? असा सवाल मनसे उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांचा केला आहे.
आपले अंतर्गत हेवेदावे तसेच कंपनी शेतकरी आणि गावकरी यांच्यात नेहमी भांडणे लावण्याचे काम करीत आपला स्वार्थ साधत आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची मुले नातेवाईक सर्वच नोकरीत लागत नाही. त्यावेळी गावाचा विचार त्या नंतर आपल्या परिसरातील तरुणांचा विचार कधीच करत नाही. प्रकल्पग्रस्त शेतकरी मात्र मोठी स्वप्न रंगवत राहतो.