कृषी विभागाचे प्रोत्साहन
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्याचा मोठा भूभाग हा डोंगररांगेच्या लगत आणि जंगल भागाशी निगडित आहे.या भागात असलेल्या जंगली वनस्पती आणि आहारात महत्वाचे स्थान असलेल्या वनस्पती यांचा उपयोग शेतकरी करीत असतात. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम कर्जत कृषी विभाग करताना दिसत आहे. दरम्यान,संतुलित आहार आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रानभाज्या तसेच वाळवीचे पदार्थ यांना बाजारात चांगली मागणी असल्याचे आढळून आले आहे.कर्जत तालुक्यात अशा रानभाज्या गोळा करून विक्रीसाठी उपलब्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम कृषी विभागाकडून तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार कोळी यांच्याकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे.
रानभाज्यांचे औषधी गुणधर्म
पातेरे, भारंग, बिडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्याही उकडून शिजवल्या जातात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, कई, मोरंगी, कंटोळी, काटेसावर, नारई, बागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त (झिंक), तांबे, कैल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नवीन फुटलेल्या कोबाच्या व पानाच्या स्वरूपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात. टाकळ्याची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाळक्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात.दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे.याशिवाय याची फुले, शेंगा, चावल, मोहोदोडे, टेलपात, माठ, शेवली, लोत, नाजीलकंद अ गावठी सुरण, पेंटर, काठ माठ, कवळा, रानतेरा, शेकटाचा पाला, रानकेळी, आंबट-मूली,लोथ सुकलेले,शेवले सुकलेले, रानकारली इत्यादी या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्या आणि खायला रुचकर असतात व नैसर्गिकपणे उगवल्याने आरोग्यासही चांगल्या असतात.
रानभाज्यांची प्रकार..
कुलुची भाजी…
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुसूची भाजी रानोमाळ दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं.
कंटोली….
कंटोली एक फळभाजी असून ती पावसाळ्यात कमीतकमी 15 दिवसात पूर्ण उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते आणि कटू सुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते.
दिंडा…
दाभा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला कॉब फुटू लागतात. पूर्ण वाद होण्याआधीच तिची कॉम ले जातात. दिहाची भाजी खास प्रसिद्ध आहे. ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडी जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुदी सारखी ही भाजी घेता येते.
कुरड…
हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुर जातीची पालेभाजी दिसु लागते. कुर पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
कळ्याची भाजी…
रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या मरानभाज्याना वाढती मागणी,कळ्याची भावी दिसायला मेथीच्या भाजी असते.रानोमाळी टाकल्याची भाजी बरोबर पसरलेली आपण आपल्या आजूबाजूला दिसू शकते.
संतुलित आहारासाठी पर्यटन करणारे शेतकरी …
मंगली गणपत हिंदोला-फोंडेवाडी,नवनाथ विष्णू शेळके-आर्डे,सुनील मालू,विशे माले,संजय म्हसे वारे,सचिन हरिश्चन्द्र मसने आंबोट,राहुल राजाराम कम्बरे -पाली,अशोक नारायण पाटील -भलीवाडी,माधव वाळकु कोळंबे चांदई,काळू बाळू निरगुडा- पाषाणे,अनंता कृष्णा भोरडे – हेडवली,बाजीराव पोखरकर -पोखरकरवाडी,गणपत गेवारी-बेलाचीवाडी