जगदीश पाटील यांचे प्रतिपादन
। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील माणकुले खार, हाशिवरेखार, सोनकोठाखार, रामकोटाखार या परिसरातील शासनाच्या खारभूमी विभागातर्फे खारलॅन्ड बांध बांधण्याची कामे होण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जगदीश पाटील उपकार्यकारी अभियंता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेक्षण विभाग पेण यांनी खारेपाट येथे स्थळ पाहणी अहवाल दौर्याच्या वेळी केले.
बंदिस्तीचे एकूण काम आठ कि.मी 600 मीटर एवढे असून त्यापैकी तीन कि.मी 200 मीटर पर्यंत कामे दगड, मुरूम, माती भराव करून पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित काम अपूर्ण आहे ते लवकरात लवकर होण्याकरिता सहकार्य केले जाईल. सदर केलेल्या बांधबंधिस्तीच्या कामांमध्ये समुद्राच्या लाटांच्यामार्यामुळे व वादळी वारे, पावसामुळे काही ठिकाणी बांध बंदीची खचली आहे. त्याची दुरुस्ती ठेकेदारांकडून करून घेण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. सदर बांधबंधिस्ती चांगल्या प्रकारे काम व्हावी याकरिता शासनाकडे व खारभूमी विभागाकडे ग्रामस्थाची सातत्याने मागणी आहे.
खारेपाट शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खारभूमी विभागाने व ठेकेदारांनी सदर बांधबंधिस्तीचे कामांचा दर्जा चांगला ठेवण्यास सांगितले. यावेळी उपविभागीय अभियंता पाडेकर, खारभूमी विभागाचे सहकारी, महेश निकम, सुजित गावंड, रमाकांत म्हात्रे, सुनील थळे, महेंद्र म्हात्रे, चेतन ठाकूर, राकेश पाटील, मुरलीधर पाटील, प्रल्हाद पाटील, चंद्रकांत पाटील, कैलास गावंड, सचिन डाकी तसेच पंचक्रोशीतील नागरिक, प्रभारी मंडळ अधिकारी कामार्ले, रांजणखार तलाठी म्हात्रे व हाशिवरे तलाठी माणकुले उपस्थित होते.