आता ‘या’ राज्याचे मुख्यमंत्रीही बदलणार?

। शिमला । वृत्तसंस्था ।
आसाम, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातनंतर आता आणखी एका राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेतृत्व बदलणार आहे का? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. कारण हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना भाजप नेतृत्वाने दिल्लीला बोलावलं आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या राज्यातील पदाधिकार्‍यांनाही बोलावलं आहे.

यामुळे हिमाचल प्रदेशातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण रविवारीच मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे दिल्लीहून परतले. तर काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री बदलण्यात आल्याने हिमाचल प्रदेशातही राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

दिल्लीत भाजप नेतृत्वासोबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजप पदाधिकार्‍यांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी अविनाश राय खन्ना, संजय टंडन, संघटनमंत्री पवन राणा आणि हिमाचल प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी पोटनिवडणुकीबाबत चर्चा होईल, असं बोललं जातंय.

Exit mobile version