। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने आम्ही प्रेरीत होऊन शहरात युवासेनेच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचवत आहोत. शहरातील शिवसेना संघटना ही मजबूत आहे. काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत त्यांच्या समर्थकांसह शिवसेना संघटनेला वेठीस धरले आहे. परंतु त्याचा तालुक्यात काही फरक पडणार नाही. युवासेना ही बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श ठेवणारी कडवट सेना आहे व सदैव मातोश्रीचा आदेश पाळणारी आहे. तालुक्यात कोणी बंडखोरीचा विचार केला तर तो यशस्वी होणार नाही अशी प्रतिक्रिया युवासेना शहराध्यक्ष शिवराज चाफेकर यांनी दिली.
काही दिवसांपासून बंडखोरी करत शिवसेना संघटने विरोधात पुकारलेले बंड व त्यातून शहरात पसरवल्या जाणार्या अफवा यामुळे शहरातील शिवसेना संघटनेमध्ये दुफळी निर्माण होणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. या शंकेला उत्तर देताना चाफेकर यांनी सांगितले की, श्रीवर्धन शहरातील शिवसेना व युवासेना संघटना मजबूत आहेत. जो कोणी अफवा पसरवत आहेत.