हिवाळी ऑलिम्पिकला बीजिंगमध्ये प्रारंभ

| बीजिंग | वृत्तसंस्था |
दोन वर्षांपूर्वी करोनामुळे उद्ध्वस्त झालेला चीन देश आता हिवाळी ऑलिम्पिकच्या रंगात न्हाऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. काही पाश्‍चिमात्य देशांनी बहिष्कार घातलेल्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. या निमित्ताने बीजिंग हा दोन्ही ऑलिम्पिकचे आयोजन करणारा पहिलाच देश ठरला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सोहळयात लेझर-किरणांचा देखावा सादर करण्यात आला. भारताने या स्पर्धेच्या प्रक्षेपणावर बहिष्कार टाकला असून आरिफ खान हा एकमेव भारतीय स्पर्धक या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.

Exit mobile version