आरक्षण नसते तर कातकरी समाज मागासच राहिला असता- आ.कपिल पाटील

खोपोली | वार्ताहर |
राजकीय पक्ष कातकरी समाजाचे मतांचा फायदा घेत आहेत. मात्र आजही कातकरी समाजातील शिक्षक नाहीत, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरकरांनी आरक्षण लिहिले नसतं तर आजही कातकरी मागासलेला असता असे प्रतिपादन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी खोपोलीत आयोजित गुणवंत शिक्षक सोहळ्यात केले आहे.
शिक्षक भारती खालापूर शाखेच्या वतीने खोपोलीतील लोहाना समाज सभागृहात गुणवंत शिक्षक आणि शिक्षक मेळावा आयोजित केला होता.शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, रा.जि.प.सदस्य नरेश पाटील ,खालापूर सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्‍वनाथ पाटील, सदस्या कांचन पारांगे, सरपंच अंकित साखरे, गटशिक्षणाधिकारी आशा खेडकर, नवनाथ गेंड, विनोद कडव, भाई ओव्हाळ, सुभाष मोरे, हिराजी पाटील, सुभाष मोरे, सतीश घूले,दिपक पाटील,कल्याणी वाझे उपस्थित होते.
यावेळी कपिल पाटील, जि.प.सदस्य नरेश पाटील यांच्यासह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल आ.कपिल पाटील यांनी अभिनंदन केले. .आशावर्करने सरकारची भाऊसाहेब बंद करून कायमचा पगार मागितला पाहिजे असे कपिल पाटील यांनी सांगत शिक्षकांच्या समस्या व्यक्त करीत सर्वांनी एकत्रित येण्याचे अवाहन केले.

Exit mobile version