। पनवेल । वार्ताहर ।
पतीसोबत दुचाकीने पनवेल येथून कामोठे येथे जाणार्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कळंबोली सर्कल येथे घडली. संगीता चंद्रकांत बेल्लुरकर (48) असे या महिलेचे नाव असून, त्या कुटुंबासह – पनवेलमधील खनाव गाव येथे राहात होत्या. संगीता या पतीसह स्कूटरवरून पनवेलकडून कामोठे येथे जात होत्या. कळंबोली सर्कल येथे सिग्नलमुळे त्या थांबल्या होत्या. मात्र, सिग्नल सुरू झाल्यावर एका ट्रकचालकाने अचानक डाव्या बाजूला वळण घेतले. त्यामुळे ट्रकचा धक्का त्यांच्या दुचाकीला लागला. त्यामुळे त्यांचे पती चंद्रकांत हे दुचाकी बाजूला घेत असताना संगीता खाली पडल्या व ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कामोठे पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे