| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी येथील राहणाऱ्या एका महिलेला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमावावा लागला आहे. प्रकृती खराब झाल्यानंतर ही महिला कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. परंतु, रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं महिलेच्या नातेवाईकांना रुग्णाला कळवा येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण रुग्ण महिलेला कळवा येथील रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. सविता गोविंद विराजदार (43) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्ण महिलेला कळवा येथील रुग्णलयात नेण्यासाठी नातेवाईकांनी पालिका आणि खासगी ॲम्बुलन्सचा तपास केला. परंतु, त्यांना ॲम्बुलन्सचा मिळाली नाही. हतबल झालेल्या विराजदार कुटुंबियांना चार तासानंतर एक ॲम्बुलन्स मिळाली. परंतु, ॲम्बुलन्स आपण कळवा रुग्णालयात नेणार नाही, जी ॲम्बुलन्स मिळाली ती एका रुग्णाला त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, असे कारण दिलं. त्यामुळे हतबल झालेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी सविता यांना त्याच रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात उपचार होतील, या आशेने विशेष म्हणजे 5 तास होऊनही रुग्णालयात डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला. याबाबत कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ॲम्बुलन्ससाठी दोन्ही मुलांचा निर्णय होत नव्हता. त्यात वेळ निघून गेला. पण नातेवाईक जे आरोप करत आहेत, त्याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.