| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील येरद येथे जबरी चोरीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.10) रोजी घडली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील येरद येथे जबरी चोरीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.10) रोजी सकाळी 7.45 वा. ते 11.45 च्या दरम्यान घडली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदार मनोहर मोकाशी, रा. येरद यांच्या घरामध्ये जबरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. तक्रारदार यांच्या पत्नी संगीता मनोहर मोकाशी, (70) हिस जबर मारहाण करून त्याच्या गळ्यातील, कानातील, हातातील असे एकूण 38400 रुपये किमतीचे दागिने चोरून महिलेला जबर दुखापत केली. या दुखापतीत संगीता मोकाशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड बाळसाहेब खाडे, पो. नि. माणगाव निवृत्ती बोऱ्हाडे, स. पो. नि. नरेंद्र बेलदार, पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्या सहित श्वान पथक, अंगुलीमुद्रा, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे करीत आहेत.