। नागपूर । प्रतिनिधी ।
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याचे सत्र सातत्याने सुरूच असून ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात कचराबाई भरडे (65) या महिलेचा मृत्यू झाला. पाच दिवसात वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेल्याने सर्वत्र भीती व दहशतीचे वातावरण आहे.
चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोनमध्ये येणार्या पळसगाव वनपरीक्षेत्रत कचरा भरडे ही महिला जंगलातबतेंडुपत्ता तोडायला गेली असता वाघाने हल्ला करून ठार केले ही घटना बुधवारी (दि. 14) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी तणावाची स्थिती आहे.