| पनवेल | प्रतिनिधी |
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक महिला कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे. कळंबोली वसाहत मध्ये राहणारी पूजा सचिन धारणकर, (25), उची 5.3, केस काळे, नाक सरळ, अंगाने मध्यम, डोळे काळे, अंगावर नेसून गुलाबी रंगाचा टॉप व सफेद रंगाची जीन्स, पायात सॅन्डल, बोली भाषा मराठी, हिंदी बोलते. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोहवा सचिन हराळे यांच्याशी संपर्क साधावा.







