थरारक घटना! कर्जतच्या रेल्वेमार्गावर आढळला महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह

शीना बोरा, पेणपाठोपाठ तिसरी घटना

। कर्जत । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात पुन्हा एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळलाआहे. कर्जत-पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा विच्छिन्नावस्थेत मृतदेह गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये सापडला आहे. शीना बोरा आणि पेणपाठोपाठ ही तिसरी थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालत्या रेल्वेमधून ही सूटकेस खाली फेकली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version