| रसायनी | प्रतिनिधी |
सयाजी शामराव बुधावणे यांची पत्नी कोमल सयाजी बुधावणे सध्या रा. मोहोपाडा या कुटुंबियांसह सातारा येथील आनेवाडी टोलनाका येथून एका अनोळखी गोकुळ दुधाच्या टँकरमध्ये बसून पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे रसायनी रीस ब्रिजखाली रात्रीच्या सुमारास उतरल्या. तेथून त्या मोहोपाडा येथे घरी आल्यानंतर त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह ठेवलेली पर्स पाहिली असता ती दिसून आली नाही. ती टँकरमध्ये विसरल्याचे लक्षात आले, म्हणून त्यांनी पतीसह त्याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पर्समध्ये दीड तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची नथ असे असल्याचे सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे व पोशी/अभिजीत पाटील यांना सावरोली टोलनाका खालापूर येथे पाठवून त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे गोकुळ दुधाचा टँकर नंबर 09 2940 हा प्राप्त करून त्यावरील चालक नामे अशोक मंडले, रा. सातारा याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याच्याशी फोनद्वारे संपर्क साधून तक्रारदार कोमल बुधावणे यांच्या पर्सबाबत विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी त्यांची पर्स सुरक्षित ठेवली असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांची पर्स वर नमूद टँकर चालक यांच्याकडून ताब्यात घेऊन ती सयाजी शामराव बुधावणे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.