साडेसातशेहून अधिक महिलांचा सहभाग
| पेण | प्रतिनिधी |
एनव्हीजी एज्युव्हेंचर्स फाउंडेशनची कोनायस्न्स स्कूल व ओव्हरकोम युएसए यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथे महिलांसाठी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकथॉनमध्ये 750 महिलांनी सहभाग घेतला होता. या वॉकथॉनचा मुळ उद्देश कॅन्सर जनजागृती हा होता. अनेक महिलांनी हातात कॅन्सरविरोधी स्लोगन असलेले फलक घेउन मोठया उत्साहात वॉकथॉन पूर्ण केला.
पेणमध्ये झालेल्या पहिल्या महिला वॉकथॉनमध्ये महिलांचा उत्साह वाखणण्याजोगे होता.12 ते 72 वयोगटापर्यंतच्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या थीमप्रमाणे महिलांनी आकर्षक पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये अगदी ग्रामीण महिलेच्या पोशाखापासून गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि महाराष्ट्राची पारंपारिक नउवारी लावलेल्या असंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेची सुरुवात सकाळी 7 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून, मा. नगराध्यक्षा प्रितम पाटील आणि डॉ.सोनाली वनगे, डॉ.संदीप चौधरी, ॲड. मंगेश नेने यांनी झेंडा दाखवून केली. तीन गटात ही स्पर्धा संपन्न झाली.
पहिला गट (12 ते 30) प्रथम क्रमांक सुप्रीया यादव द्वितीय क्रमांक अचाल जैन तृतीय क्रमांक सुप्रीया चौधरी
दुसरा गट (30 ते 50) प्रथम क्रमांक शुभांगी अमित पाटील द्वितीय क्रमांक सुविधा भास्कर पाटील तृतीय क्रमांक पुजा योगेश उळे
तीसरा गट (50 पुढील) प्रथम क्रमांक शुभांगी आठवले द्वितीय क्रमांक साधना तुलसीदास म्हात्रे तृतीय क्रमांक शीतल भोसले
यासह आरोग्यदृष्टया त्रुटी असणाऱ्या महिला तसेच पारंपारिक पोषाख घालणाऱ्या महिला यांना विशेष पारितोषिक दिले. त्यांच्याप्रमाणे इनरव्हील क्लब पेण, फ्लोरेंझ फ्रेन्डस फॉरेव्हर या महिलांच्या ग्रुपलादेखील विशेष पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा ॲड. निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर अमेरिकेहून लाईव्ह डॉ. प्रिया भोसले यांनी महिलांशी कॅन्सर विषयावर संवाद साधला.