। पनवेल । वार्ताहर ।
हवा भरलेला टायर डंपरला लावत असताना अचानक टायर फुटल्याने पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना खारपाडा टोलनाक्याजवळ घडली असून आझादलाल मोहम्मद मंसुदी असे या घटनेतील मृत कामगाराचे नाव आहे.
आझादलाल याने डंपरच्या टायरचे पंक्चर काढून टायरमध्ये हवा भरली. त्यानंतर तो डंपरला टायर लावत असताना अचानक टायर फुटला आणि आझादलाल भिंतीला जाऊन आदळला. यात त्याच्या कपाळाला आणि पायाच्या मध्यभागी गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.