पाताळगंगा गेटवर परिवारासह धडकणार
| आपटा | प्रतिनिधी |
गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेला समान काम समान वेतन हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 7 सप्टेंबर 2026 रोजी सुमारे 1800 कामगार सहपरिवार मोहपाडा येथून अचानक मैदानावरून रिलायन्स कंपनी गेटवर मोर्चा काढणार आहेत. 10 मे 2015 रोजी किमान वेतन आणि समान काम समान वेतन या मागणीसाठी संघर्षी सुरुवात झाली होती. कंत्राटी कामगारांना सेवाकाळात मिळालेल्या कमी वेतनाची फरक मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. ऑल इंडिया इंडस्ट्रीज अँड जनरल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखालील अकरा वर्षांपासून हा संघर्ष चालू होता. शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांना ठोस तोडगा काढता आला नाही. पनवेल कामगार आयुक्त कार्यालय दिलेल्या पाहणी अहवालामुळे कामगारांना मागण्या योग्य आहेत व कामगारांच्या मागण्यांना कायदेशीर बळकटी मिळाली आहे.
या कंपनीमध्ये सुमारे 1800 कामगार विविध 58 कंत्राटी मध्ये काम करत होते. यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले होते. पण, याला काही यश आले नाही; परंतु कामगार न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्यांना समान काम समान वेतन हे मिळालं पाहिजे या संदर्भात हा मोर्चा असून, रिलायन्स कंपनी यावर काय तोडगा काढते हे पाहणे गरजेचे आहे.
या 1800 पैकी 180 कामगार हे मयत झाले असून, कंपनीने त्यांनाही त्यांचा मोबदला दिला पाहिजे. रिलायन्स कंपनीचे नाव मोठे लक्षण खोटे ही अशी अवस्था नको आणि कामगारांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा मोर्चा काढला. याबाबत कामगारांशी बोलताना सांगितले, एवढी मोठी नाव असलेली कंपनी आम्हाला न्याय देऊ शकत नाही ही खंत आहे आणि खेदाची गोष्ट आहे, आम्ही येथे अकरा वर्षे काम केलं; पण आम्हाला योग्य ते वेतन मिळाले नाही आणि याबाबत सरकारी दरबारी आम्ही अकरा वर्षे भांडलो म्हणून हा मोर्चा काढणार आहे. आता तरी कंपनीने या कामगारांना न्याय द्यावा, अशी रास्ता अपेक्षा या कामगार संघटनेने ठेवलेली आहे.







